Breaking

Kite flying nylon manja : प्रशासनाची एक चूक आणि तरुणाचा गेला जीव

Yoth died due to negligence of administration : नागपुरात केले ते अकोल्यात केले असते तर वाचला असता जीव

Akola मकरसंक्रांतीला पंतग उडविताना मांज्यामुळे एकाचा बळी गेला. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणाचा हा बळी ठरला आहे. नागपुरात ज्याप्रमाणे उड्डाणपूल मकर संक्रांतीच्या दिवशी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते त्याचप्रमाणे अकोला ते उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली असती तर निष्पाप कारागिराचा जीव वाचला असता.

नायलाॅन मांजामुळे गळा चिरल्याने एका ३४ वर्षीय युवकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. १४ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजता पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर उड्डाणपूलावर ही घटना घडली आहे. संपूर्ण दिवसभरात नायलाॅन मांजामुळे शहरात चार जण व ग्रामीण भागात तीन असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. किरण प्रकाश साेनवणे (३४ रा.अकाेटफैल अकाेला)असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

Suspense on Guardian Minister : प्रफुल्ल पटेल ठरवतील गोंदियाचा पालकमंत्री!

किरण साेनवणे हे खासगी इलेक्ट्रिशियन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते निमवाडी परिसरातून दुचाकी क्रमांक एमएच ३० एजी-१९७२ ने नेहरु पार्क चाैकाकडे निघाले हाेते. पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेरील उड्डाणपूलावर येताच त्यांच्या गळ्याला नायलाॅन मांजाचा फास बसून गळा चिरला गेला. या घटनेत किरण जागेवरच काेसळले व माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणन्यात आला हाेता. यावेळी खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार मनाेज केदारे यांनी सर्वाेपचारमध्ये धाव घेतली.

याप्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

नायलाॅन मांजामुळे तीन जण जखमी

शहराच्या विविध भागात नायलाॅन मांजामुळे तीन जण जखमी झाल्याचे समाेर आले. यामध्ये दादाराव वानखेडे मलकापूर, श्लाेक इंगळे, सुमित गायकवाड रा.खडकी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Nana Patole : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचाही जीव घेणार का ?

प्रशासकीय यंत्रणांची उदासिनता जीवावर

जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्रीला बंदी घाण्याचा आदेश जारी केला हाेता. हा आदेश शहरासह संपूर्ण जिल्हाभरात ६ डिसेंबर २०२४ च्या रात्रीपासून ३१ जानेवारी २०२५ च्या रात्री १२ पर्यंत लागू आहे. या कालावधीत पाेलिसांनी नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाइ केली हाेती. इतर प्रशासकीय यंत्रणांनी थातूर मातूर कारवाया करुन वेळ मारुन नेल्याचे दिसून आले.