Breaking

Kokate Rummy Game : कृषीखाते अजित दादांनीच संभाळावे

Rohit Pawars demand, strong attack from the opposition : रोहित पवारांची आग्रही मागणी, विरोधकांचा जोरदार हल्ला,

Mumbai : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राजीनाम्याची मागणी जोर धरत असून, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कृषीखाते सोपवण्याची मागणी केली आहे.

कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधाने करत असल्याचे सांगत, रोहित पवारांनी त्यांच्यावर कडवट टीका केली. कोकाटे विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रमी खेळतात. पत्ते घरी खेळा, विधानभवनात नाही. हे ठिकाण मजा करण्याचे नव्हे, ही जबाबदारीची जागा आहे, असे म्हणत त्यांनी कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. ते शेतकऱ्यांना आणि सरकारलाही भिकारी म्हणाले, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे रोहित पवार म्हणाले. माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून एखाद्या जबाबदार नेत्याला द्यावे. अजित दादांनी स्वतःच हे खाते सांभाळावे. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अजित पवारांना उद्देशून असेही विचारले की, तुमच्यावर तर नियंत्रण आहे, पण मंत्र्यांवर नाही का?

Tanushree Dutta : माझ्यावर सुशांतसिंगसारखं करायचा प्रयत्न

विरोधकांच्या आरोपांवर माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते की, राजीनामा देण्यासारखं काय घडलंय? मी कुणावर विनयभंग केला नाही, चोरी केली नाही. माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. केवळ एक व्हिडीओ काढला म्हणून इतका गदारोळ? मी व्हिडीओ काढणाऱ्याला कोर्टात खेचणार आहे. साधा पाय घसरला तरी चर्चा होते. लोक सोशल मीडियावर काहीही बोलतात दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल पण ही सगळी अफवा आहे.या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. कोकाटेंच्या विधानंमुळे आणि वर्तनामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी मुद्दा मिळाला आहे. अजित पवार आता या विषयावर काय निर्णय घेतात, कोकाटेंच्या खात्याबाबत बदल होतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.