Breaking

Krushna Khopde : नागपूरकरांना Ground Rent पासून मुक्ती द्या!

Give exemption from ground rent to 62 thousand land holders : ६२ हजार भूधारकांसाठी आमदार खोपडे सरसावले

Nagpur सुमारे ६२ हजार भूधारकांसाठी पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पुढाकार घेतला असून त्याला ग्राऊंड रेन्ट भरण्यापासून सूट द्या अशी मागणी केली आहे. याबाबत ते मुख्यमंत्र्यांचीदेखील भेट घेणार आहेत.

नागपूर शहरामध्ये नासुप्र व मनपा या दोन शासकीय संस्था आहे. शहराचे नागरिक मनपाचा कर भरतात तसेच नासुप्रच्या जागेवर असलेले निवासी / वाणिज्यिक भूधारक ग्राउंड रेंट सुद्धा भरतात. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक भार पडत असून नासुप्रच्या ग्राउंड रेंट पासून आता मुक्त करा. अशा प्रकारची विनंती शासनास करणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

भूखंड निवासावर विनियोग १९८३ अनुसार दिलेल्या लीजच्या जागेवर २ टक्के ग्राउंड रेंट घेण्यात येते. ना.सु.प्र. ने आतापर्यंत ५८९५६ भूखंड ३० वर्षाच्या स्थायी पट्ट्यावर वाटप केले आहे. २ टक्के ग्राउंड रेंट भरण्यास नागरिकांना अडचण होत असून त्यातून मुक्तता मिळावी, अशी आमदार कृष्णा खोपडे यांची मागणी आहे.

मी स्वत: यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन भेटून चर्चा करणार असून नागपूर शहराच्या ६२७६४ भूखंडधारकांना ग्राउंड रेंट मध्ये सवलत किंवा पूर्णपणे माफ करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचे कृष्णा खोपडे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या लीजवर असलेल्या जागेसंदर्भात शासनाने २०२३ रोजी शासन निर्णय केला. अशा लीजधारकांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा दिला असून निवासी ०.४ व वाणिज्य ०.७ अशा प्रकारचे वार्षिक दर निश्चित केले. याच धर्तीवर नासुप्रने भूखंडधारकांना दिलासा देऊन किंवा एकमुश्त रकम घेऊन किंवा पूर्णपणे माफ करून दिलासा देण्यासंदर्भात पावले उचलणार असल्याची माहिती आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली.