Breaking

Ladki Bahin : चारचाकी वाहन असलेल्या १० हजार महिला ‘लाडकी बहिण’ योजनेतून अपात्र

10,000 women with four-wheelers disqualified from ‘Ladki Bahin’ scheme : फेब्रुवारीपासून मानधन बंद; आतापर्यंत मिळालेले पैसे परत घ्यायचे नाहीत

Amravati : विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांची फेरतपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील १०,७६६ महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. चारचाकी वाहन, अडीच लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न आणि अन्य निकषांच्या उल्लंघनामुळे या महिलांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही. मात्र, यापूर्वी मिळालेले मानधन त्यांच्याकडून परत घेतले जाणार नाही. फेब्रुवारी २०२५ पासून त्यांचे मानधन थांबवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एकूण ७ लाखांवर महिलांनी योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांपैकी ६,९८,५३६ महिला पात्र ठरल्या. निवडणुकीनंतर नव्या सरकारने सर्व अर्जांची फेरतपासणी सुरू केली आणि नियम मोडणाऱ्या अर्जदारांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले. फेरतपासणीदरम्यान संभाव्य कारवाईच्या भीतीमुळे २० महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला. परिणामी, जिल्ह्यात अपात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या १०,७८६ वर पोहोचली आहे.

पात्र महिलांना २१०० रुपये केव्हा मिळणार?
पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा २१०० रुपयांचे मानधन कधी मिळणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तिन्ही पक्षांनी याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.