Group of women started Co-operative Society to help others : ३ हजार महिलांनी गोळा केला ३० लाखांचा निधी; सचिवांनी दिली माहिती
Nagpur मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूर मधील महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे. ३ हजार महिलांनी 30 लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. आता या निधीतून स्वतः छोटे उद्योग सुरू करणार आहेतच. शिवाय इतर महिलांनाही या पैशातून छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देत आहेत. लाडक्या बहिणींची ही success story महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितली आहे.
या महिला एखादी दुर्घटना घडली तर मदत करत आहेत. भांडवलावर मिळणाऱ्या व्याजावर ही सोसायटी पुढे कार्यरत राहणार आहे. अशा पद्धतीने ज्या महिला पुढे येतील त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभाग Support System देखील उभी करणार आहे. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) या महिलांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा शब्द सचिवांनी दिला आहे.
महिला काटकसर करून आपल्या गरजा पूर्ण करत असतात. किराणा सामान भरणे, मुलांची फी किंवा औषधांवर पैसे खर्च होत असतात. या योजनेतील लाभार्थी ग्रामीण क्षेत्रातील जास्त प्रमाणावर आहेत. किराणा सामान तसेच इतर छोट्या-मोठ्या दुकानदारांकडे खरेदी होत असल्याने गावातल्या छोट्या व्यापाऱ्यांना देखील याचा अप्रत्यक्षरित्या लाभ होतो. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत जवळपास १.५ लाख व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानामार्फत सुमारे ६ लाख याप्रमाणे सुमारे ७.५ लाख महिला बचत गट ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत.
Ajit Pawar : कुठल्याही परिस्थितीत खेळाची मैदाने खेळासाठीच वापरा !
या बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित येऊन निधी उभा करुन महिलांना विविध उद्यमशील उपक्रम राबविण्यास सदर योजनेमूळे शक्य होत आहे. या सर्व बाबींमुळे ग्रामीण भागामध्ये निधीचा inflow वाढणार असून ग्रामीण भागामध्ये circular अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागामध्येच गरजांची पूर्तता होणार आहे. आणि शहरांकडे होणारे स्थंलातरण थांबण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ.अनुपकुमार यादव यांनी व्यक्त केला.