6 lakh 91 thousand women are getting benefit of scheme : 6 लाख 91 हजार लाडक्या बहिणींना मिळतोय लाभ
Yavatmal महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे. महिला व मुलींना स्वावलंबी बनविणे. तसेच आत्मनिर्भर बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेने जिल्ह्यातील तब्बल 6 लाख 91 हजार महिलांना आत्मनिर्भर बनविले आहे.
या महिलांना प्रति महिना 1 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. योजनेच्या लाभासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला पात्र. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
School Education Minister Dada Bhuse : पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् !
लाभार्थी महिला राज्यातील रहिवासी असावी, तिच्या कुटुंबांचे वार्षिक उत्तन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. तसा उत्पन्न दाखल सादर करावा लागतो. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Governor C.P. Radhakrishnan : शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या संशोधनाची गरज!
महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र किंवा पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदान कार्ड देखील ग्राह्य धरल्या जाते.
लाभार्थी महिलेच्या कुटुंब प्रमुखाचा 2 लाख 50 हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला, बॅंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॅाक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड आदी कागदपत्र नोंदणीच्यावेळी सादर करावे लागतात.