Ladki Bahin Scheme : एका रेशनकार्डवर एकीलाच लाभ; नणंद-भावजय, सासू-सूनेत पेटले वाद!

Family disputes increased due to new rules in the scheme : ‘लाडकी बहीण’मधील नव्या नियमांमुळे वाढला कौटुंबिक कलह

Buldhana महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आर्थिक भार वाढल्याने सरकारने या योजनेवर नवीन निर्बंध आणले असून, आता एका रेशनकार्डवरील महिलांपैकी फक्त एकीलाच लाभ मिळणार आहे. यामुळे सासू-सून, आई-मुलगी, नणंद-भावजय, जावा-जावांमध्ये लाभासाठी वादाची ठिणगी पडली आहे.

अंगणवाडी सेविका घरोघरी सर्वेक्षण करत असून, प्रत्येक घरात कोणाला हा लाभ द्यायचा, याची निवड करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रेशनकार्ड आणि आधारकार्डची छाननी होत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे बहुतेक रेशनकार्डवर दोनपेक्षा अधिक महिलांची नावे असल्याने प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.या नियमामुळे घराघरात भांडणे सुरू झाल्याचे चित्र दिसत असून, “शासनाने योजना आणली मतांसाठी, आणि आता घरातच तणाव वाढवला” असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांनी आणले 12 हजार पानांचे ‘बॅगभर’ पुरावे !

“निवडणुकीच्या तोंडावर महिलांचे मत मिळवण्यासाठी योजना जाहीर केली, आता आर्थिक ताणामुळे मर्यादा घालून महिलांची फसवणूक सुरू आहे,” असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. “योजना सुरू ठेवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक होते. प्रत्येक पात्र महिलेपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी प्रक्रिया काटेकोर केली आहे,” असे सरकारचे म्हणणे आहे.

Ganesh Utsav : गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेला राजकीय रंग?

गावागावात “माझे नाव ठेवा, नाही तर भांडण” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सासू-सून किंवा आई-मुलगी यांच्यातून तणाव वाढल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे योजना महिलांच्या सबलीकरणाऐवजी तणावाचे कारण ठरत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.