Breaking

Ladki Bahin : या ‘२९’ महिलांसाठी सत्ताधारी नाहीत ‘लाडके भाऊ’!

There have been complaints that some ineligible women have also applied for this scheme : काही अपात्र महिलांनीही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत

Buldhana News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे. या चर्चेमुळे जिल्ह्यातील अनेक अपात्र लाभार्थींनी चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत २९ महिलांनी स्वयंस्फूर्तीने अर्ज करून योजनेचा लाभ नाकारला आहे. प्रशासनाच्या मते, हा आकडा पुढील काही दिवसांत आणखी वाढू शकतो.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेल्या या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये देण्याची तरतूद आहे. या योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. जिल्ह्यात एकूण ६,४१,८५४ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, काही अपात्र महिलांनीही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्रशासनाने योग्य लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ramdas Tadas : कुस्तीत कलर होल्डर पटकाविणारी खुशाली ठरली द्वितीय मल्ल !

अपात्र महिलांचाही पुढाकार
पडताळणीच्या चर्चेमुळे अनेक अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज करून लाभ नाकारला आहे. योजनेत आतापर्यंत सहा हप्त्यांमधून प्रत्येकी ₹9000 वाटप झाले आहे. लाभ नाकारणाऱ्या महिलांकडून ही रक्कम परत वसूल केली जाणार नाही. मात्र त्यांना यापुढे लाभ दिला जाणार नाही.

कुठे करायचा अर्ज?
अपात्र लाभार्थींनी लाभ सोडण्यासाठी अर्ज जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. प्रशासनाने अपात्र लाभार्थींना स्वयंस्फूर्तीने अर्ज करून लाभ सोडण्याचे आवाहन केले आहे. योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Dr. Pankaj Bhoyar : महाराष्ट्राला देशातून तिसरा क्रमांक, कोणार्क येथे खाणमंत्र्यांची परिषद !

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अर्ज करावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यंडोले यांनी केला आहे.

तथ्ये:
जिल्ह्यातील एकूण लाभार्थी: ६,४१,८५४
आतापर्यंत लाभ सोडणाऱ्या महिलांची संख्या: २९