410 crores again from Social Justice Department for June installment : जून महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून पुन्हा 410 कोटी
Mumbai : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी वर्ग करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी असे म्हणले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी सहायक अनुदाने 3960.00 कोटीनियतव्यय मंजूर आहे.
वित्त विभागाच्या संदर्भाधीन परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार लाडकी बहिण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जून महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशिर्षाखाली रु.410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. असे अध्यादेशात म्हटले आहे.
Sandip Joshi : मतिमंद शाळेवर संकट, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला वबाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी
विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलाना लाडकी बहिण योजनेव्दारे दुस-यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी.
महायुतीमधील घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला होता. या योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांना कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे 16,500 रुपये मिळाले आहेत. ही रक्कम ज्या महिला पहिल्या पासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळाले आहेत.
Zilla Parishad Nagpur : जिल्हा परिषदेची लेटलतिफी, शिक्षकांना मनस्ताप!
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या जीआर नुसार 500 रुपये मिळतात. शासनाचं धोरण एका लाभार्थ्याला एका वर्षात 18000 रुपये मिळावं हे असल्यां दोन्ही योजनांचे मिळून 12 हजार मिळतात त्यामुळं उर्वरित 6000 रुपये दरमहा 500 रुपयांप्रमाणं लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा संख्या 8 लाखांच्या घरात आहे.