Breaking

Ladki bahin yojana : जिल्ह्यातील ५१ हजार लाडक्या बहिणींची ‘ओवाळणी’ होल्डवर!

Benefits of 51 thousand ladaki bahin in the district on hold : ६५ वर्षांवरील व एका कुटुंबातील तिसरे लाभार्थी प्रतिक्षेत

Buldhana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत “कुटुंब” या संकल्पनेतील विसंगतीमुळे जिल्ह्यातील तब्बल ५१,४३० महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. या महिलांमध्ये ६५ वर्षांवरील १२हजार १३३ तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी आढळलेल्या ३९,२६७ महिलांचा समावेश आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या निर्णयात “कुटुंब” याची व्याख्या वेगळी असून, शिधापत्रिकेतील व्याख्या भिन्न आहे. या फरकामुळे अंमलबजावणीत गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या लाभ तात्पुरता थांबवण्यात आला असून, शासनाच्या स्पष्ट व्याख्येनुसार नव्याने पडताळणी सुरू आहे.

Animal feed prices increased : १५ ऑगस्टपासून दूध विक्रीच बंद करतो, विक्रेत्यांचा इशारा

राज्य शासनाने आता स्पष्ट निर्देश दिले असून, फक्त २१ ते ६५ वयोगटातील दोन महिलांनाच लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक लाभार्थींना तात्पुरता झटका बसला असला तरी, योजनेतून कायम वगळण्यात आलेले नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात सध्या ६.११ लाख महिलांना लाभ मंजूर झाला आहे. यातील पात्रतेच्या नव्या निकषांनुसार अंतिम यादीत घट होण्याची शक्यता आहे. मात्र पात्र ठरणाऱ्या महिलांना पुढील टप्प्यात लवकरच लाभ पुन्हा सुरू होईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Local Body Elections : जिल्हा परिषद प्रभाग रचना; आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण

यापूर्वी झालेल्या पडताळणीत २४,८२८ महिलांचे अर्ज बाद झाले होते, तर २१७ महिलांनी स्वेच्छेने योजना नाकारली होती. नव्याने सुरू असलेल्या पडताळणीकडे आता हजारो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या काही भागांत पुरुषांनी योजनेत नोंदणी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात अशा प्रकारचा एकही पुरुष लाभार्थी नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महिलांनी आपल्या कागदपत्रांची तातडीने तालुका कार्यालयात पडताळणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.