ladki bahin Yojana : लाडकी बहीण’ योजने संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

E-KYC is mandatory, otherwise installment will not be deposited : ई-केवायसी बंधनकारक, अन्यथा जमा होणार नाही हप्ता

Mumbai : लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले असून सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतून खरंच गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी आता लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील २ कोटी ५२ लाख लाभार्थींपैकी सुमारे २७ ते २८ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये शासकीय महिला कर्मचारी, उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी घेतलेला लाभ आणि अगदी १४,२९८ पुरुषांचाही समावेश असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

Sudhir Mungantiwar : हा रक्ताचा एक थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा ! : हा रक्ताचा एक थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा !

विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. मात्र अपात्र महिलांची संख्या वाढत असल्याने आता सरकारने थेट उपाययोजना हाती घेतली आहे. यासाठी सर्व लाभार्थी महिलांना दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

ई-केवायसीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक टाकून आधार प्रमाणिकरण करावे लागणार आहे. तसेच संबंधित महिलेला आपल्या पती किंवा वडिलांचे आधार प्रमाणिकरण करून आपण शासकीय सेवेत नसल्याचे घोषणापत्र भरावे लागेल.

Voters increased : महाराष्ट्रात सात महिन्यांत 14.71 लाख नव्या मतदारांची नोंद

या निर्णयामुळे योजनेतील पारदर्शकता वाढणार असून खरंच पात्र आणि गरजू महिलांच्याच खात्यात सरकारचा आर्थिक आधार जमा होणार आहे.