Ministers complain about delays in getting funds for development works : विकास कामांसाठी निधी मिळण्यात विलंब होत असल्याची मंत्र्यांची तक्रार
Mumbai: राज्याची महत्त्वकांक्षी योजना असलेली, ‘लाडकी बहीण योजना’ राजकीय वादाचा विषय बनत आहे. या योजनेमुळे विकास कामांसाठी निधी मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी अधून मधून समोर येत आहे. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. विरोधकांना यामुळे नवा मुद्दा मिळाला आहे आणि राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. योजनेचे फायदे आणि तोटे यावर चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘गेमचेंजर’ ठरली. या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेसाठी अनेक विकासकामांचा, विविध विभागाचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप वारंवार होत आहे. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराने लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधीसाठी दिरंगाई होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा लाडकी बहीण योजनेवर आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
MLA Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक प्रस्तावावर जागतिक मोहोर!
कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच इंदापूरमधील घरकुलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तालुक्यातील विकास कामे आणि त्यासाठी मिळणाऱ्या विकास निधीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विकास निधी मिळण्यास विलंब होण्यामागे ‘ लाडकी बहीण योजना’ कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या किंवा कुठेही, त्यातून माझ्या तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आज लाडकी बहिण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला. पण आज सर्व हळूहळू गाडी सुरळीत झाली आहे, असे भरणे यांनी म्हटले आहे.
Ujjwal Nikam: उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विधानसभेच्या निवडणुकी आधीपासून चांगलीच गाजत आहे. सुरुवातीपासून या योजनेवर अनेक शंका उपस्थित केल्या जात होते. मात्र सरकारने लाडक्या बहिणींना तात्काळ दरमहा रक्कम द्यायला सुरुवात केली. नंतर मात्र विविध विभागाचे मंत्री, आमच्या विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवत असल्याच्या तक्रारी करत आहेत. यावरून विरोधकांना सरकारला घेरण्याची संधी मिळत आहे.