Breaking

Ladki Bahin Yojna : ‘लाडक्या बहिणी’ साड्यांपासून वंचित!

 

Sarees distributed to only 19,116 beneficiaries : योजनेचा खेळखंडोबा; ४५,६६४ पैकी फक्त १९,११६ लाभार्थींनाच वाटप

Akola अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना साडी भेट देण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पात्र ४५,६६४ लाभार्थ्यांपैकी केवळ १९,११६ महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले आहे.

राज्य शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप केले जाते. विविध घटकांतील लाभार्थ्यांसाठी शिधापत्रिकांचे वाटपही केले जाते, ज्यामध्ये गहू, तांदूळ, मका आणि साखरेचा समावेश असतो. त्याचप्रमाणे, अंत्योदय कार्डधारकांना रेशनच्या साड्या मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

होळी सणानिमित्त या साड्या वाटप करण्याचे निर्देश होते. त्यानुसार फेब्रुवारीच्या शेवटी जिल्ह्यातील गोदामांमध्ये साड्या दाखल झाल्या, मात्र त्यांचे वितरण मार्चमध्ये सुरू झाले. जिल्ह्यातील ४५ हजारांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु तालुकानिहाय वाटपाचा वेग संथ आहे.

Ladki Bahin Yojna : सव्वातीन हजार लाडक्या बहिणी रडारावर

तालुकानिहाय पात्र लाभार्थी

अकोला तालुका: ६,७१०
अकोला शहर: २,०२९
अकोट: ६,७१४
बाळापूर: ५,५८९
बार्शीटाकळी: ७,२३५
मूर्तिजापूर: ६,१८१
पातूर: ५,०९७
तेल्हारा: ६,०९८

Rahul Narvekar : ..तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला गालबोट लागेल !

साड्यांचे वितरण २६ जानेवारी ते होळी दरम्यान करण्याचे शासनाने निश्चित केले होते. पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने राज्य यंत्रमाग महामंडळाला सूचना दिल्यानंतरही साड्यांचे वितरण उशिराने सुरू झाले. त्यामुळे अनेक महिलांना अद्याप साडी मिळालेली नाही. महिलांना साडी वाटप प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रशासनाने अधिक तत्परता दाखवावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.