Breaking

Ladki Bahin Yojna : ४० बहिणींकडे कार आहे, तरीही झाल्या ‘लाडक्या’!

Women took advantage of the scheme even when they had a four-wheeler : अर्जांची पडताळणी सुरू; अनेक लाभार्थी होतील अपात्र

Gondia अंगणात चारचाकी नांदत आहे. घरी बऱ्यापैकी सुबत्ता आहे. पण तरीही सरकारच्या योजनेचा लाभ घेतला. अशा ४० ‘लाडक्या’ बहिणी प्रशासनाला गवसल्या आहेत. त्यांचा योजनेचा लाभ आता तातडीने बंद होणार आहे. या मालिकेत आणखीही अनेक लाभार्थी हाती लागू शकतात, असा अंदाज प्रशासनाला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांच्या पडताळणीला सुरुवात झाली आहे. बरेच पात्र नसणारे लाभार्थीसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता अर्जांची पडताळणी करून त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शुक्रवारी (दि.७) जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला चारचाकी वाहने असणाऱ्या ४० लाभार्थी महिलांची यादी प्राप्त झाली आहे. याची पडताळणी करून अहवाल पाठविला जाणार आहे.

Vidarbha Farmers : अप्रमाणित कीटकनाशक विकणे भोवले!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र व अपात्र असलेल्या लाभार्थींची पडताळणी करताना पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे. त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे, अशांची पडताळणी होईल. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी चारचाकी वाहन व नाेकरीवर असलेल्या महिलांनीसुद्धा अर्ज केले होते. त्यांनी अनुदानाची उचलसुद्धा केली आहे.

शासनाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर आता अशा लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्यास सुरुवात करण्यात आली. बऱ्याच लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासह खोटी कागदपत्रे जोडल्याचेसुद्धा पुढे आले. त्यामुळे अर्जासह जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी शासनाकडून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला चारचाकी वाहने असणाऱ्या ४० लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली. या यादीतील नावांची पडताळणी करून माहिती शासनाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nitesh Rane : राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत म्हणजे ‘थ्री ईडीयट्स’ !

गोंदिया जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण ३ लाख ६३ हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते. अर्ज करताना कागदपत्रे जोडली होती. लाभार्थ्यांनी जोडलेली कागदपत्रे बरोबर आहेत का याची पडताळणी करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. यासाठी एक नमुना पत्रक तयार करून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला पाठविण्यात आले. त्यानुसार अर्जांची पडताळणी केली जात आहे.

किती महिलांच्या नावावर चारचाकी वाहनांची नोंद आहे याची माहिती शासनाने परिवहन विभागाकडून घेतल्याची माहिती आहे. ही माहिती घेऊन यापैकी कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे का, याची पडताळणी केली जात असल्याची माहिती आहे.

Warning of Irrigation Department : प्रशासनाचा हलगर्जीपणा, नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट

ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत आणि जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा ४० महिलांच्या नावाची यादी शुक्रवारी शासनाकडून प्राप्त झाली. या यादीची पडताळणी करून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे, असं गोंदियाचे निवासी उपजिल्हाधिकारी भय्यासाहेब बेहरे यांनी म्हटले आहे.