व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Lakhni APMC : संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराचा ‘काटा‘ काढला; लाखनी कृषी उत्पन्न बाजार...

Lakhni APMC : संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराचा ‘काटा‘ काढला; लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ

allegations-of-2.36 lakhs-fraud-in-lakhni-apmc : २ लाख ३६ हजार रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप, गुन्हे दाखल करण्याची मागणी

Bhandara लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने लुबाडणुकीसाठी स्थापित केलेला वाहन काटा अखेर वैध मापन शास्त्र कार्यालयामार्फत जप्त करण्यात आला. मात्र मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात या काट्याच्या माध्यमातून सुमारे दोन लाख ३६ हजार रुपयांची अफरातफर केली असल्याने संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सध्या लाखनीमध्ये या काट्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संचालक मंडळाला तुरुंगात घालण्याची मागणी केली जात आहे.

लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी जगदीश भांडारकर या अनधिकृत व्यक्तीकडून ६० मे. टन क्षमतेचा अवैध धर्मकाटा काटा ५ लाख आठ हजार रुपयांमध्ये खरेदी केला होता होता. त्यावेळी हा वाहन काटा हा सॅनसुई या कंपनीचा असल्याचे भासविले होते. तसे बनावट बिलही सादर केले होते तसेच वैध मापन शास्त्र कार्यालयाकडून मुद्रांकन व पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले होते.

Congress proposal : उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभा काँग्रेसला द्यावी !

मात्र लेखा परीक्षण अहवालातून संचालक मंडळाचे बिंग फुटले. संचालक मंडळाने वैध मापन शास्त्र कार्यालयात मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम रायपूर या कंपनीकडून पाच लाखात वाहन काटा खरेदी केल्याचे दर्शवण्यात आले होते. तर समितीच्या रेकॉर्डवर चेतन वैरागडे यांच्याकडून सात लाख ४४ हजार रुपयांमध्ये तो विकत घेतल्याचे दाखविण्यात आले.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिपराज इलमकार यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. त्यांनी सूत्रे फिरवली. संचालक मंडळाने घेतला वाहन वजन काटा निश्चित केलेल्या निकषात बसणार नव्हता. त्यामुळे तो जप्त करण्याकरिता अधिकारी आले असता त्याची मुदत संपल्याचे समोर आले होते. त्यामुळे २० हजार रुपयांचा दंडही संचालक मंडळावर ठोठावण्यात आला होता.

Raj thackeray : मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे!

मात्र २०२० ते २०२५ बेकायदेशीर काटा वापरून ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे, त्यांच्याकडून अवैध मार्गाने लुबाडलेली रक्कम वसूल करावी तसेच फसवणूक व दिशाभूल केल्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिपराज इलमकार यांनी केली आहे. शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या बाजार समितीच्या संचालक मंडळाची गावात मोठी चर्चा आहे. बाजार समितीच्या कामकाजावर व भ्रष्टाचाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

error: Content is protected !!