Struggle for 40 years to get technical category : भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संप, सरकारी कामे रखडली
Nagpur गेल्या ४० वर्षांपासून तांत्रिक वेतन श्रेणी मिळावी म्हणून भूमी अभिलेखचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. यासह त्यांच्या इतरही मागण्या आहेत. या मागण्यांसाठी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत कामबंदमुळे मोजणीसोबत फेरफारची कामे ठप्प पडली आहेत व सर्वसामान्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे प्रलंबित मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. शासनाच्या या दिरंगाईविरुद्ध महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, पुणे विभागाने यापूर्वीच कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटने पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून कामे केली.
Constitution of India : संविधानाच्या ७५ कलमांवर ७५ तास चर्चा!
त्यानंतरही शासनाकडून मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच्या कामबंदमुळे नागपूर जिल्ह्यातील फेरफारसह मोजणीची कामे ठप्प झाली आहेत. हद्द कायम मोजणी, भूसंपादन, कोर्ट कमिशन, कोर्ट वाटप, बिगरशेती मोजणी ही कामे संपामुळे थांबली आहेत. नगर भूमापन कार्यालयाची वारस, खरेदी, बोजा व इतर नोंदींची सर्व कामे खोळंबली आहेत.
SP of Buldhana : पोलीस अधिक्षकांनी स्पष्टच सांगितले, ‘अवैध धंदे खपवून घेणार नाही’
संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे यांनी सांगितले की, सद्यःस्थितीत नागपूर जिल्ह्यातील सुमारे २२५ व विभागातील १५०० कर्मचारी संपात सहभागी आहेत. शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने संविधान चौकात नारे, निदर्शनेही केली.