Sharad Pawar should not lie even in his old age : एक तर जरांगेला पाठींबा द्या, नाहीतर मंडल यात्रा काढा
Nagpur : शरद पवार यांनी आजवर केवळ आपल्या स्वार्थाचं राजकारण केलं. आता ओबीसींचा पवारांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांनी आता नौटंकी करू नये. एकतर मनोज जरांगेला पाठिंबा द्यावा, नाहीतर मंडल यात्रा काढावी. एकीकडे जरांगेला पाठींबा द्यायचा अन् दुसरीकडे मंडल यात्रा काढायची, हे ढोंग आता चालणार नाही. किमान म्हातारपणी तरी खोटं बोलू नका. कारण मग तुमच्यावर काही बोलणे आम्हा बारक्यांना शोभणार नाही, असे म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर तोफ डागली.
लक्ष्मण हाके यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, बेकायदा मागणी करून कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या, मुंबईला वेठीस धरणाऱ्या, महाराष्ट्राच्या मानसीकतेवर परिणाम करणाऱ्या आणि ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या माणसाला बेड्या ठोकल्या पाहिजे. याचे साथीदार जेलमध्ये गेले. याला (मनोज जरांगे) मराठवाड्यातील जिल्ह्यांतून हद्दपार केले पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही.
Guardian Minister Bhandara : मोठा निर्णय, भंडाऱ्याचा पालकमंत्री बदलला !
मनोज जरांगे यांनी याअगोदरही गुलाल उधळला आहे. या माणसाला संविधानाबद्दल काय कळतं. याला आरक्षणातील काहीच कळत नाही. मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढणे बरोबर आहे का? अजित पवार आणि शरद पवार यांच्या भरोशावर पैसे उकळणे आणि महाराष्ट्रात जातीच्या वर्चवस्वाची लढाई लढणे हाच जरांगेचा अजेंडा आहे, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. मी समोरासमोर लढणारा माणूस आहे. त्यांनी माझा पुतळा जाळला, पुतळा कशाला जाळता? मी स्वतः येतो, मला जाळण्याचा प्रयत्न करा. आम्ही ओबीसींचे हक्क आणि अधिकारांसाठी बळी जाण्यास तयार आहोत, असेही हाके म्हणाले.