Breaking

LIVESTOCK CENSUS : Deadline जवळ आली तरी, फक्त ४१ टक्के पशुगणना!

Deadline is approaching, only 41 percent of the cattle census has been done : २८ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण कसे होणार?

Gondia गेल्या दोन महिन्यांपासून २१ वी पशुगणना सुरू आहे. पण जिल्ह्यात पशुगणनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत फक्त ४१.४८ टक्के पशुगणना झाली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे अल्पावधीत गणना पूर्ण होणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अद्यापही पशुगणना करणारे पथक अनेक गावांत पोहोचलेच नसल्याची माहिती आहे.

प्राण्यांची संख्या निश्चित करण्यासाठी आणि त्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी पशुगणना केली जात आहे. देशातील २१ व्या पशुगणनेचे काम २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू करण्यात आले. पशुगणनेची अंतिम मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. जिल्ह्यात पशुगणनेचे कामही सुरू आहे. पशुगणनेमध्ये १६ पशुधन प्रजाती, कोंबडीची जात, वय आणि लिंग यांची माहिती सर्वेक्षण करून संकलित करायची आहे. गोंदिया जिल्ह्यात अंदाजे ९५५ गावे आहेत.

100 Days Program : लोकांसोबत सौजन्याने वागा!

पशुगणना करण्यासाठी एक मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे ही पशुगणना केली जात आहे. पण जिल्ह्यातील काही गावांमध्ये इंटरनेटची समस्या आहे. त्यामुळे पशुगणनेत इंटरनेटची समस्या भेडसावत आहे. परिणामी पशुगणना संथगतीने सुरू असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ४१.४८ टक्के पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अवघ्या २५ दिवसांत ५८ टक्के काम कसे पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

CM Devendra Fadnavis : ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मुळे विदर्भ उद्योग क्षेत्राच्या केंद्रस्थानी

प्रशासन गावात पोहोचलेच नाही
पशुगणना सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला. पण अद्याप अनेक गावांमध्ये प्रशासन पोहोचलेलेच नाही, हे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे आता बसल्या जागेवरून पशुगणना करणार की अंदाजे आकडा नोंदवणार, असा प्रश्न विचारला जात आहे. डेडलाईन संपायला तीन आठवडे देखील शिल्लक राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत कोणती जादूची काडी प्रशासन फिरवणार आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.