Udhhav Thackeray Shiv Sena warns Mahavitaran : महावितरण कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा
Buldhana लोणार शहरासह तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या विजेच्या अनियमित पुरवठ्यावरून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. “वीजप्रवाह सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू,” असा थेट इशारा उद्धवसेनेच्या जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी दिला.
वीजपुरवठ्यातील वारंवार खंडामुळे घरगुती उपकरणे जळत असून, सामान्य जनतेवर आर्थिक मार बसत आहे. तरीही महावितरणकडून निष्क्रियता कायम असल्याचा आरोप करत, शहरप्रमुख गजानन जाधव यांनी म्हटले की, “नियमित बिल व सर्व शुल्क आकारूनही सेवा अपुरी मिळते, ही ग्राहकांची फसवणूक आहे.”
Santosh Deshmukh murder case : वाल्मिकला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट, बडतर्फ पीएसआयचा दावा !
या आंदोलनात्मक इशाऱ्याने लोणारच्या वीज प्रश्नाला आता राजकीय धग बसली असून, राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा जिल्हास्तरीय सक्रिय हस्तक्षेप दाखवून देण्यात आला आहे. यावेळी तालुकाप्रमुख ॲड. दीपक मापारी, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, सुदन अंभोरे, सिद्धार्थ अंभोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय व प्रशासकीय पातळीवर लक्ष न दिल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उद्धवसेनेने दिला आहे. महावितरणच्या कारभारावर यामुळे दबाव निर्माण झाला आहे. लाेणारसह जिल्हाभरात वीजपुरवठा वारंवार खंडीत हाेत आहे़ त्यामुळे, सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
Amravati Municipal Corporation : भाजपमधून निलंबित, आता शिंदे गटात जाणार!
गत काही दिवसांपासून जाेरदार पाउस सुरू आहे़ अशा स्थिती पाउस सुरू हाेताच वीज पुरवठाही खंडीत करण्यात येताे़. त्यामुळे, सर्वसामन्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़