Breaking

load shedding : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महावितरणच्या कार्यालयात धडक

Gram Panchayat office bearers reach Mahavitaran office : भारनियमनामुळे त्रस्त, विजेअभावी पाणीपुरवठ्यात अडथळा

Buldhana देउळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगावमहीत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांनी नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. दररोज पाण्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांच्या संतप्त भावना आता रस्त्यावर उतरू लागल्या असून २२ मे रोजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.

ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. वीर यांना निवेदन देण्यात आले. ‘गावाची लोकसंख्या १५ ते २० हजार आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होतो. मात्र विजेअभावी तो पूर्णतः विस्कळीत झाला आहे. धरणात पाणी असूनही वीजखंडामुळे नागरिकांना कोरड्या नळांचा सामना करावा लागतो. प्रशासनाने याकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही परिस्थितीत कोणताही सुधार दिसून येत नाही.”

Bacchu Kadu : बच्चू कडूंसह चार सहकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

या परिस्थितीवर ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी थेट आक्रमक भूमिकेत आले आहेत. सरपंच वसुदेव शिंगणे, उपसरपंच धर्मा खिल्लारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर शिंगणे, माजी सरपंच रामा म्हस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की,

“महावितरणने विजेच्या स्थिर आणि नियमित पुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर ग्रामपंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. लोकप्रतिनिधींना आणि ग्रामस्थांना अधिक वेळ थांबणे शक्य नाही.”

Dharmarao Atram : आत्राम म्हणतात, भाजपनेच महायुतीचा धर्म मोडला

या प्रकरणातून स्थानिक स्वराज्य संस्थांची मर्यादित सत्ता आणि महावितरणसारख्या राज्यस्तरीय यंत्रणांचा हठधर्मी कारभार पुन्हा अधोरेखित झाला आहे. गावाच्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विजेच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनानेही आतापर्यंत दुर्लक्ष केल्याने ही बाब राजकीय व सामाजिक चर्चेचा विषय ठरत आहे.