Loan waiver : बिनव्याजी कर्ज मिळतंय, मग ते वेळेवर फेडायची सवय लावा !

      Ajit Pawars statement casts doubt on the promise of loan waiver! : अजित पवारांच्या वक्तव्यामुळे कर्जमाफीच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह !

Mumbai: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेत, 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा तोडगा काढणार असल्याचं आश्वासन दिलं. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अजितदादांनी रोखठोक भाषेत बोलताना शेतकऱ्यांनाच फटकारलं. “शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिलं जातंय, मग ते वेळेवर फेडायची सवय लावा ना. सारखं फुकटात, सारखं माफ कशाला हवं? एकदा शरद पवार यांच्या काळात कर्जमाफी झाली, नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाली, उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली, आता पुन्हा माफ करा म्हणताय. किती वेळा माफ करणार?” असा सवाल त्यांनी केला.

अजितदादांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण, कालच सरकारने कर्जमाफीच्या मुदतीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. पण लगेचच अजित पवार यांच्या भाषणाने सरकारच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

Irregularities in Voter Lists : मृत्यूनंतरही पंधरा वर्षे मतदार यादीत नाव

दरम्यान, नागपूरात शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनात अनेक शेतकरी नेते सहभागी झाले होते. काही संघटना मात्र या आंदोलनापासून दूर राहिल्या. सरकारने लगेच प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली आणि 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. या निर्णयानंतर सरकार मोकळं झालं असं वाटत असतानाच अजितदादांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

Sampada Munde Scicide case : डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही!

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “शेतकरी संकटात असताना अशा असंवेदनशील भाषेत बोलणं अत्यंत चुकीचं आहे. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली, असं म्हणणं म्हणजे लोकांची फसवणूक आहे. मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिली आणि आता शेतकऱ्यांशी बेईमानी करताय. शेतकरी चून चून के बदला घेतील,” असं वडेट्टीवार म्हणाले.

Vidarbha farmers : राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी द्या!

या सर्व घडामोडींमुळे आता शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, सरकार खरंच कर्जमाफी करणार का, की फक्त वेळ मारून नेतंय? अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे सरकारच्या आश्वासनावर शंका उपस्थित होत असून, शेतकरी पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहेत.