Loan waiver : कर्जमाफीचा मुहूर्त काढायला यूपीमधून बामन आणून देतो

Take a decision soon, Bachchu Kadu’s blunt criticism of Fadnavis : लवकर निर्णय घ्या, बच्चू कडूंची फडणवीसांवर बोचरी टीका

Mumbai: सांगोला तालुक्यातील घेरडी येथे झालेल्या शेतकरी आसूड मेळाव्यात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “कर्जमाफीसाठी अभ्यास सुरू आहे” असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत बच्चू कडू म्हणाले, “अजूनही कर्जमाफीचा मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहत आहात का? तुम्हाला मिळत नसेल तर यूपीमधून एखादा बामन आणून देतो, पण शेतकऱ्यांची लगेच कर्जमाफी करा.”

या कार्यक्रमाला महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि आबासाहेब मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना बच्चू कडू यांनी फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार या दोन्हीवर तिखट शब्दांत हल्लाबोल केला.

Local Body Elections : सत्ता, संघर्ष आणि रणनीतींचा खेळ,नागपूरच्या राजकारणात ताप वाढतोय!

कडू म्हणाले, “आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही. एवढं लबाड बोलणं देवाभाऊंनी केलं आहे. आता सांगतात की सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलाय. पण मोदींना कधी जाग येईल आणि सोयाबीन खरेदी कधी सुरू होईल, हे काही ठाऊक नाही.”

शेतकऱ्यांच्या हालहवालावर बोलताना त्यांनी पुढे सांगितले, “दुर्दैवानं सध्या ज्यापासून झेंडा बनतो त्या कापसाला किंमत नाही, पण झेंड्याच्या रंगाला मात्र किंमत आली आहे. तुम्ही कोणताही झेंडा घ्या, पण त्या झेंड्यासाठी कापूस बनवणाऱ्या तुमच्या बाप शेतकऱ्याच्या कापसाला किंमत नाही.”

Raut Vs Shinde : संजय राऊतांचा शिंदे गटावर भाजपमध्ये ‘विलीन’ होण्याचा गंभीर आरोप

राज्याच्या अर्थकारणावरही त्यांनी सवाल उपस्थित केला. “मुंबईला एक लाख कोटींचं बजेट असूनही राज्य सरकार त्यातून 65 हजार कोटी रुपये मुंबईला देते. मात्र उर्वरित महाराष्ट्राला त्यापेक्षा कमी मिळतं. हे अन्यायकारक आहे. आम्ही शेतकरी संख्येने, मतदानाने आणि श्रमाने जास्त आहोत, तरी आमच्याकडे दुर्लक्ष होतंय. मूठभर उद्योगपतींना जादा बजेट देतात, कारण शेतकरी अजूनही जागा झालेला नाही,” असे ते म्हणाले.

केंद्र सरकारवरही टीका करत बच्चू कडू म्हणाले, “56 इंच छाती सांगणारे मोदी ट्रम्पसमोर घाबरतात आणि तिथे नमाज पडतात. शेतकऱ्यांवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्याय सुरू आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जात, धर्म, पक्ष सोडून एकत्र यायला हवं, अन्यथा परिस्थिती बदलणार नाही.”

____