Local body election : निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले

BJP-Ajitdada group alliance in Raigad; Shinde group is shocked : रायगडमध्ये भाजप–अजितदादा गटाची युती; शिंदे गटाला धक्का

Mumbai : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले असतानाच रायगड जिल्ह्यात एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात महाड नगर परिषदेसाठी अधिकृत युती जाहीर झाली असून, शिवसेना शिंदे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. महाडसह संपूर्ण रायगडमधील राजकीय गणित बदलल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले दोघांचाही प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना दिल्यानंतर गोगावले नाराज होतेच, त्यात आता भाजप–अजितदादा गटाच्या संयुक्त घोषणेने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

Delhi blast case : कारब्लास्टचा मुख्य आरोपी उमर मोहम्मदचे घर केले उद्ध्वस्त !

महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नगराध्यक्ष पदासह 16 जागांवर राष्ट्रवादी उमेदवार, तर 5 जागांवर भाजप उमेदवार रिंगणात राहतील. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला या निर्णयात स्थान न मिळाल्याने, महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे अशी त्रीकोनी लढत अपरिहार्य झाली आहे.

Local Body Elections : नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून खामगावमध्ये सर्वेक्षण सुरू!

या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि भाजप जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हमुनकर उपस्थित होते. स्थानिक पातळीवरील राजकारण आणि तटकरे गोगावले समिकरणामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटासाठी ही मोठी प्रतिमात्मक आणि संघटनात्मक धक्का मानला जात आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर स्वतंत्र युती आणि तडजोडी होत असताना, रायगडमधील हा निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढतीत मोठे राजकीय वादळ निर्माण करणार, हे स्पष्ट झाले आहे.

______