Local Body Election : प्रभारींकडून काँग्रेसची झाडाझडती, निवडणुकीसाठी केले बदल

Congress reviews situation, makes changes for elections : अकोल्यासाठी डॉ. सुनील देशमुख, दिलीप सरनाईक व अनंत वानखडे यांची नियुक्ती

Akola जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यासाठी माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, दिलीप सरनाईक आणि अनंत वानखडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे अकोला शहरातील अकोला पूर्व आणि पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दिलीप सरनाईक यांच्याकडे अकोट आणि मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी असेल. बुलढाणा जिल्ह्यातील अनंत वानखडे यांच्याकडे बाळापूर मतदारसंघाचा प्रभार सोपवण्यात आला आहे.

Maratha Reservation : ओबीसींचा राज्यस्तरीय एल्गार शेगावात!

प्रदेश सरचिटणीस गणेश नाईक यांनी ४ सप्टेंबर रोजी या संदर्भातील नियुक्ती आदेश जारी केले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभारींनी तातडीने बैठक घेऊन तयारीचा आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभारींनी अकोला जिल्ह्यातील काँग्रेसची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.

Rural Vidarbha : नाल्याच्या पाण्यातून चालत शाळेत जातात विद्यार्थी

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दशकात प्रथमच काँग्रेसला आमदार मिळाले असल्यामुळे यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये चांगले यश मिळविण्याच्या दृष्टिकोनातून कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्ष सोडून दिलेल्या काही वरिष्ठ नेत्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्यासाठी प्रभारी कडून प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.