Local Body Election : मतदारांच्या नव्हे, तर नेत्यांच्या मनात आहे जात !

Devendra Fadnavis Says: Caste Exists Not in Voters’ Minds, But in Politicians’ Hearts : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर जातीचे विषय मागे पडतील

Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. जातीचे मुद्दे पुढे करून राजकारण केले जात आहे. तसेही निवडणुका जवळ आल्या की जात आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी काढून राजकारण केले जाते. जात ही मतदारांच्या मनात नाहीच मुळी, तर नेत्यांच्या मनात जास्त आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की जातीचे विषय मागे पडतील. जातींचे प्रश्न आहे, मात्र त्यासाठी असे राजकारण कुणी करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागपुरात आज (२३ ऑक्टोबर) मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. शक्तिपीठ महामार्गासंदर्भात अलाईनमेंट चेंज होऊ शकतो. खासकरून सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये बदल केले जाऊ शकतात. त्यावर विचार सुरू आहे. नवीन नागपूरच्या संदर्भात ९० टक्के लोकांचा नवीन नागपूरसाठी जमीन देण्यासाठी सकारात्मक विचार आहे. बीकेसीच्या धर्तीवर बीझनेस डिस्ट्रीक्ट उभारण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Congress protest : सरकारने केली शेतकरी आणि बेरोजगारांची घोर फसवणूक

नळगंगा – पैनगंगा नदी जोड प्रकल्पाचा डीपीआर तयार आहे. त्यासाठी काही मान्यता घेण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून जमिन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करणार आहोत. नक्षलवादासंदर्भात फडणवीस म्हणाले की, जंगलातील शत्रू कोण आहेत, हे माहिती होते. पण शहरी नक्षलवादात शत्रू कोण आहे, हेच कळत नाही. त्यामुळे ही समस्या आधी सोडवण्यावर सरकारचा भर आहे. मंत्र्यांचे परफॉरमन्स ऑडीट सतत सुरू असते. गुजरातमध्ये अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बदल झाले. आपल्याकडे अजून एकच वर्ष झालं आहे. त्यामुळे बदलासाठी आपल्याकडे वाट बघावी लागणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात आगामी काळात बदलाचे संकेत दिले.