Devendra Fadnavis Says: Our Party Workers Could Contest Elections from Sharad Pawar’s Party : विरोधकांना ‘ती’ स्पेस देणार नाही, मुंबईत १०० टक्के युती करू
Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जेथे फायदा असेल, तेथे आम्ही युती करू. जेथे नुकसान होईल, तेथे युती करणार नाही. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती केली तर आमचे लोक शरद पवार यांच्या पक्षात जाऊन निवडणूक लढतील. ती स्पेस आम्ही विरोधी पक्षाला का द्यायची, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत १०० टक्के युती करू. पण एमएमआर भागांत काही ठिकाणी वेगवेगळी निवडणूक लढू, असेही ते म्हणाले.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले उपरोक्त विधान चर्चेचा विषय ठरत आहे. नागपुरात आज (२३ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमच्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र काँग्रेसला सध्या अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रासले आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातही असे घडले नव्हते. पण राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मात्र असे घडते आहे. ते फक्त डिस्ट्रक्टीव्ह मुद्दे उचलत आहेत. सरकारऐवजी संविधानिक स्तरावर ते हल्ले चढवत आहेत, जे की आपल्या देशासाठी जास्त घातक आहे.
Jain boarding case : धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप; व्यवहाराला स्थगिती !
मतदार याद्यांतील घोळाच्या विरोधकांच्या आरोपाबाबत विचारले असता, मतदार याद्यांमध्ये दोन-चार ठिकाणी आजही काही नावे नाहीत. हे सर्व गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहे. अशा घोळाबद्दल मी सन २०१२ पासून उच्च न्यायालयातील याचिकाकर्ता आहे. पण अजून त्याचा निकाल लागलेला नाही. हा प्रकार फक्त ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागांतही जास्त आहे. दोन-तीन ठिकाणी नावे असताना एकापेक्षा जास्त ठिकाणी कुणी मतदान केले असेल, तर हे विरोधकांनी दाखवून द्यावे. पण असे घडत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. माओवादावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माओवाद लवकरच पूर्णपणे संपुष्टात येईल. महाराष्ट्रात जवळपास संपुष्टात आला आहे. छत्तीसगडमधूनही लवकरच माओवाद हद्दपार होईल.