Facility to check your name verification online : आपल्या नावाची पडताळणी ऑनलाईन पाहण्याची सुविधा
Mumbai : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या नावाची पडताळणी सुलभपणे करता यावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने यादी ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. मतदार आपले नाव अधिकृत संकेतस्थळ https://mahasecvoterlist.in/ येथे शोधू शकतात.
राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. या आधारे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी निर्वाचक गणनिहाय, तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
Ministers raid : महसूलमंत्र्यांची धाड! कार्यालयात सापडले 5 हजार रुपये
नागरिकांना ही यादी ऑनलाईन पाहता यावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahasec.maharashtra.gov.in/ या दुव्याद्वारेही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप मतदार यादी संबंधित तहसील कार्यालयात पाहता येईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींची प्रारूप मतदार यादी संबंधित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असेल.
Parab Vs kadam : योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब आग्रही !
नागरिकांना यादीची छायांकित प्रत मिळवण्यासाठी प्रत्येक पृष्ठासाठी दोन रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मतदार यादी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, मतदारांनी आपल्या नावाची खात्री करून घेण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
____