It takes 100 bucks, Sanjay Gaikwads statement : १०० बोकडं लागतात, संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची चर्चा
Buldhana : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तीन-तीन कोटी रुपये खर्च होतात, काही ठिकाणी तर १०० बोकडंही दिली जातात,” असे गायकवाड यांनी उघडपणे सांगितले.
बुलढाण्यात बोलताना गायकवाड म्हणाले, “आम्हाला भाजप-शिवसेना युती पाहिजे आहे आणि ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आम्ही विधानसभेला युती करतो, लोकसभेला युती करतो. पण ज्या वेळी कार्यकर्त्यांची गरज असते, त्यावेळी त्यांना वाऱ्यावर सोडतो. त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचं आहे का?”
स्थानिक निवडणुकीच्या खर्चावर त्यांनी भाष्य करताना सांगितले, “जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका आता सोप्या राहिलेल्या नाहीत. एक-एक, दोन-दोन, तीन-तीन कोटी रुपये खर्च होतात. काही ठिकाणी तर शंभर बोकडं दिली जातात. इतक्या महाग निवडणुकीत कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे युतीला तयार आहोत.”
Narendra Modi : “८०च्या दशकात नरेंद्र मोदींना पहिल्यांदा भेटलो !
गायकवाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “ज्याला जशी सवय तसं वक्तव्य. त्यांना खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे. त्यांच्या पोटातलं तोंडावर आलं. ते ३ कोटी आणि १०० बोकडांची भाषा करतात. खरं सांगायचं तर गायकवाड सत्य बोलतात आणि सत्य करतात. पण किती बोकडं पोसून ठेवलीत, किती कोटी जमा केले, आणि किती वाटणार आहेत, हे पाहणं गरजेचं आहे.”
Viral clip of Haake : पैशासाठी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाने हाकेंची काढली लाज!
वडेट्टीवार यांनी पुढे निवडणूक आयोगाकडे लक्ष वेधण्याची मागणी केली. “निवडणुकीत किती कोटी रुपये आणि किती बोकडं दिली जातात, यावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाला पत्र लिहावं लागेल,” असं ते म्हणाले. गायकवाड यांच्या थेट वक्तव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पैसा आणि शक्तीचं राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे.








