Local body election : भाजपचे अजितदादांच्या ‘होमग्राउंड’वर मोठे जाळं;

More than ten NCP leaders on verge of leaving ‘Ghadyal’ : राष्ट्रवादीचे दहा हून अधिक नेते ‘घड्याळ’ सोडण्याच्या मार्गावर

Pune : महापालिका निवडणुका जवळ येताच महायुतीतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून आता भाजपने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय किल्ल्यावर पिंपरी चिंचवडमध्ये मोठे राजकीय जाळं फेकले आहे. शिंदे गटासोबतच्या संघर्षानंतर भाजपने आता आपले लक्ष्य अजित पवार गटावर केंद्रित केले असून राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बुरुजांवर ताबा मिळवण्यासाठी ऑपरेशन सुरू केले आहे.

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवरील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अजित पवार गट बचावाच्या भूमिकेत गेला असतानाच भाजपाने राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर निर्णायक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सुमारे दहा माजी नगरसेवकांशी भाजप नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Harshawardhan Sapkal : काँग्रेसमध्ये शिस्तभंगाची मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार झाला निर्णय !

2017 च्या निवडणुकीत भाजपाने 77 जागा जिंकत सत्ता मिळवली होती, तर राष्ट्रवादी 32 जागांवर विजयी झाली होती. सत्ता हाती आल्यानंतर दोन्ही पक्षांतील मतभेद अधिक वाढले आणि आता महायुती तुटल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे आमनेसामने आली आहे. भाजपाने नव्या महापालिका निवडणुकीत ‘शंभरी पार’ करण्याचे ध्येय ठेवले असून, मजबूत चेहरे दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीतील तगडे नेते आयात करण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Local Body Elections : पालिका रणधुमाळीत माजी आमदार पुन्हा सक्रिय

भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पुष्टी केली की, राष्ट्रवादीच्या दहाहून अधिक माजी नगरसेवकांशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी भाजपात प्रवेशाची तयारी दर्शवली आहे. काटे यांच्या वक्तव्यामुळे भाजप, राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महायुती तुटल्यामुळे भाजप 128 पैकी सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. अलीकडील अंतर्गत सर्व्हेतही भाजपाला अनुकूल वातावरण असल्याचे दिसत असल्याने इच्छुकांनी तिकिटांसाठी मोठी धावपळ सुरू केली आहे.

Local Body Elections : महापालिका निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचा पर्याय, बैठकांना वेग

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार असल्याने या भागातील राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरल्या आहेत. 2017 प्रमाणेच पुन्हा भाजपाचा ‘इनफ्लो पॅटर्न’ दिसण्याची चिन्हे आहेत. मात्र याचवेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी वाढली आहे. जर आयात केलेल्या नेत्यांना तिकीट दिले गेले तर अंतर्गत नाराजी उसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

यामुळे भाजपाने ज्या प्रभागांमध्ये पक्ष तुलनेने कमकुवत आहे, तिथेच ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याची रणनीती आखल्याचे समजते. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या अडचणी वाढत असताना भाजपाने केलेल्या या हालचालीमुळे अजित पवारांच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काही दिवसांत कोणते नेते प्रत्यक्षात भाजपात दाखल होतात, याकडे राज्याचे राजकीय लक्ष लागून राहणार आहे.

________