Local body election : आपलं कोणी शत्रू नाही, पण सगळीकडे युती शक्य नाही !

Praful Patels clear instructions to workers : प्रफुल्ल पटेलांची कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना

Tiroda : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. गोंदियातील तिरोडा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी युतीऐवजी स्वतंत्र लढाईवर भर द्यावा, असे स्पष्ट शब्दांत कार्यकर्त्यांना सांगितले.

पटेल म्हणाले, युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे. जिथे जमेल तिथे युती होईल, नाही जमली तर ती सोडून द्यायची. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही. एखाद्या प्रभागात आपला उमेदवार असेल, पण युतीतील दुसऱ्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला, तर आपल्या उमेदवाराला मागे सारणं मला योग्य वाटत नाही. म्हणून जिथे सोयीचं वाटेल तिथे युतीचा विचार करू, पण त्यातही खात्री नाही.

Illegal Sand Mafia : रेती माफियाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक, सहा जणांवर गुन्हे दाखल

प्रत्येक प्रभागात उमेदवार उभा करण्याचा पक्षाचा निर्णय असल्याचे सांगत पटेल म्हणाले, नगरपालिकेमध्ये काही देणं-घेणं ठरलेलं नाही. त्यामुळे आपण आजपासूनच प्रत्येक प्रभाग आणि नगराध्यक्ष पदावर लढण्याची तयारी सुरू केली पाहिजे. अन्यथा आपण गफलतीत राहू.,

उमेदवार ठरवताना आरक्षण, जातीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार करणं आवश्यक असल्याचे पटेल यांनी अधोरेखित केले. महिला आरक्षण असेल तर महिला, ओबीसी आरक्षण असेल तर त्यानुसार, एससी-एसटी किंवा मुस्लिम समाजातील मतदारसंख्या जास्त असेल तर ते लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. घड्याळ चिन्हाला विविध वर्गांमधून मतं मिळण्याची क्षमता आहे, ती ओळखून तयारी केली पाहिजे,” असे पटेल म्हणाले.

Vidarbha Farmers : पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा; लोकप्रतिनिधींचे दावे फोल

कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देत त्यांनी स्पष्ट केले, आपले कोणी शत्रू नाहीत. आपला पक्ष वाढवायचा आहे. दुसऱ्या पक्षातून कोणी येत असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. संकोच न करता पक्ष मजबूत करण्यावर भर द्यायला हवा. महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाने आता स्वबळावर मोर्चेबांधणी सुरू केली असून, कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा स्पष्ट संदेश प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे.