Breaking

Local Body Election : कार्यकर्त्यांचे कौतुक, पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र!

 

Shiv Sena conducted review meeting : शिवसेना लागली कामाला, निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना

Akola सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने अकोला जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह, अकोला येथे पार पडली. जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर व अश्विन नवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस विविध स्तरांतील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाची संघटनबांधणी, कार्यपद्धती, नियोजन आणि प्रचार यंत्रणेवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर व अश्विन नवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्थानिक पातळीवरील निवडणुका म्हणजेच पक्षबांधणीसाठीची खरी कसोटी आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात संघटना बळकट करणे आवश्यक आहे.

या बैठकीस महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, शहरप्रमुख रमेश गायकवाड, तालुकाप्रमुख विजय वानखडे, पप्पू मोरवाल, सचिन गालट, महिला समन्वयक आनंदी पांडे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत पक्ष संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले.

Vidarbha Farmers : उघड्यावर धान, ताडपत्रीचा आधार अन् नुकसानाचा धोका!

या बैठकीदरम्यान अकोला पश्चिम, अकोला पूर्व आणि पातुर विधानसभा क्षेत्रांतील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या हस्ते करण्यात आले. तसेच काही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Migration from villages : आश्वानांचाच उजेड, गावे मात्र आजही अंधारात

बैठकीच्या शेवटी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’ Operation Sindoor या उपक्रमाद्वारे देशाने दिलेले सडेतोड उत्तर हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.