Thackeray group criticizes government for not using “VVPAT” : “व्हीव्हीपॅट” वापरत नसल्याबद्दल ठाकरे गटाची सरकारवर टीका
Mumbai : राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर – जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचाच वापर होणार असून मतदार यादीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात गेल्या तीन वर्षांपासून मुंबईसह 27 महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांवर प्रशासकांची सत्ता आहे. निवडणुका वेळेवर न घेता शासनाने प्रशासकांमार्फत कारभार चालवला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांचे वेळापत्रक ठरवले असल्यामुळे निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
cabinet reshuffle : वादग्रस्त वक्तव्य टाळून कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद !
दरम्यान, शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाशित होणाऱ्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर व भाजपवर टीका करण्यात आली आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याचा निर्णय हा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच, भाजपवर निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करून वेळकाढूपणा करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये सरकारने यापूर्वी वेळोवेळी कारणे देत निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मतदार यादीत अनियमितता, ईव्हीएमच्या वापराबाबत शंका आणि निवडणूक आयोगातील नियुक्त्यांवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
Kisan Congress : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर याद राखा, किसान काँग्रेसचा सरकारला इशारा
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी मध्य प्रदेशातून 25 हजार ईव्हीएम मशिन्स मागवण्यात येणार आहेत. यावरून देखील राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केली आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये अचानक वाढलेले मतदार व त्यांच्या मतदानाचा कल यावरूनही ईव्हीएम संदर्भात आरोप झाले होते.