Waiting for the election program to be announced : देऊळगावातील राजकीय चित्र बदलतेय
Buldhana : गेल्या तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. आता ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील पुढारी त्यासाठी सज्ज झालेले आहेत. मिशन इलेक्शन सुरू झाले असून राजकीय पुढाऱ्यांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी साखरपेरणी सुरू केली आहे.
देऊळगाव राजा राजकीय चित्र बदलताना दिसते आहे. अनेक वर्षे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा तालुक्यात एकहाती प्रभाव होता. दरम्यान नगरपालिकेत डॉ. शशिकांत खेडेकर यांनी त्याला सुरूंग लावला. आता आमदार मनोज कायंदे यांनी तालुक्यात जम बसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे सहा गण आहेत. नवीन परिसीमनानुसार आणखी एक गट व दोन गण वाढण्याची शक्यता आहे.
Students are stressed : लिपिक – टंकलेखक : दोन वर्षांनंतरही निवड नाही, विद्यार्थी तणावात !
महायुती आणि महाविकास आघाडीतील फोडाफोडी आणि इन – आऊट घडामोडींमुळे यंदाची निवडणूक राजकीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील राजकारण तापत चालले आहे. मिशन झेडपीसाठी इच्छुकांचा मोर्चा तयार झाला आहे. आता वाट आहे ती फक्त निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची.
गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांमुळे या संस्थांमध्ये प्रशासक कार्यरत होते. परिणामी, स्थानिक स्तरावर विकासकामे आणि जनतेच्या अडचणींबाबत ठोस निर्णय घेतले जात नव्हते. आता निवडणुका निश्चित होत असल्याने इच्छुक पुढाऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मे महिना लग्नसराईचा असतानाही अनेक नेत्यांनी वेळ काढून गावोगावी गाठीभेटी घेणे, कार्यकर्त्यांना भेटणे आणि पक्षांतर्गत समीकरणं मजबूत करण्यावर भर दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावरही हालचाली सुरु असून, मागील रोस्टरच्या आधारे संभाव्य आरक्षणाचे आडाखे काढले जात आहेत.