32 objections for 52 constituencies in Akola district : जि.प. प्रभाग रचनेवरील आक्षेपांवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी
Akola जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर दाखल आक्षेप व हरकतींची सुनावणी मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. अकोला जिल्ह्यातील ५२ सर्कलसाठी एकूण ३२ हरकती दाखल करण्यात आल्या असून, या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेवर निर्णय दिल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणांनी तयारी सुरू केली असून, काही दिवसांपूर्वी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या रचनेवर आक्षेप व हरकतींसाठी तहसील कार्यालयांमध्ये अर्ज मागवण्यात आले होते.
Maharashtra politics : वर्चस्वासाठी बेरजेचे डाव, जनतेच्या प्रश्नांचं गूढ मात्र कायमच!
तालुकानिहाय हरकतींची संख्या:
तालुका दाखल आक्षेप
पातूर २३
बाळापूर ०४
अकोला ०३
तेल्हारा ०१
अकोट ०१
बार्शी टाकळी ००
मूर्तिजापूर ००
अंतिम प्रभाग रचनेवर १८ ऑगस्ट रोजी शिक्कामोर्तब
जिल्हा प्रशासन आक्षेपांवर सुनावणी करून पुढील कार्यवाही करीत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेवर १८ ऑगस्ट रोजी अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
Narahari Zirwal : कोकाटे नंतर आता झिरवाळ वादात, अधिकारी आक्रमक,
प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर काही माजी जि.प. सदस्यांना राजकीय लाभ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही प्रभागांत सदस्यांच्या मूळ गावांचा समावेश झाल्याने त्यांना फेररचनेचा थेट फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, काही संभाव्य उमेदवारांनी असमाधान व्यक्त करत आक्षेपही नोंदवले आहेत. प्रारूपात अपेक्षित बदल न झाल्यास असंतोष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आता विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.