35 Objections Approved, 9 Applications Rejected; Final List on October 31 : खामगाव नगर पालिका मतदार यादीवरील हरकतींवर सुनावणी
Khamgao आगामी नगर पालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि आक्षेपांवर नगर पालिकेत सुनावणी पार पडली. खामगाव नगर पालिकेच्या सुभाषराव देशपांडे सभागृहात मुख्याधिकारी डॉ. स्व. प्रशांत शेळके यांच्या उपस्थितीत ही सुनावणी घेण्यात आली.
निवडणूक विभागाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर एकूण ४९ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३५ हरकती मंजूर, ४ हरकती अंशतः मंजूर, तर ९ हरकत अर्ज अमान्य करण्यात आल्याची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे. याशिवाय एकत्रित हरकतीकरिता दाखल झालेला एक अर्जही निकाली काढण्यात आला आहे.
Local Body Elections : मूलभूत सुविधांशिवाय विकास कसा?, नागरिकांचा सवाल
लक्षवेधी बाब म्हणजे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सर्वात कमी हरकती खामगाव नगर पालिकेत दाखल झाल्या आहेत. सुनावणीदरम्यान विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, उमेदवार तसेच हरकती दाखल करणारे नागरिक उपस्थित होते.
NCP Politics : मी मंत्री झालो तर गडचिरोलीचा विकास वेगाने होणार !
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी खामगाव नगर पालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.








