Local Body Elections : मतदार याद्यांतील गोंधळावर शिक्कामोर्तब!

78 Objections on Voter List Approved in Buldhana Municipal Council : बुलढाणा पालिकेत ७८ आक्षेप मंजूर, राजकीय गणिते पुन्हा बदलण्याची शक्यता

Buldhana जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात असताना, मतदार याद्यांवरील गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. बुलढाणा नगरपालिकेत दाखल झालेल्या ७९ आक्षेपांपैकी तब्बल ७८ आक्षेप मंजूर करण्यात आल्याने, निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

८ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या प्राथमिक मतदार याद्यांवर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्यानुसार बुलढाण्यातील आक्षेपांची सुनावणी उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, तसेच विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि आक्षेपदार उपस्थित होते.

Sampada Munde Suicide : प्रशासनाने दुर्लक्ष केले, जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी

सुनावणीत ७८ आक्षेपांना मंजुरी आणि फक्त १ आक्षेप फेटाळण्यात आल्याने, मतदार याद्यांतील नावे, क्रमांक आणि प्रभागवाटपात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मंजूर आक्षेपांच्या आधारे स्थळपाहणी आणि दस्तऐवजी पडताळणी करून सुधारित मतदार यादीत आवश्यक बदल केले जाणार आहेत. ज्या प्रकरणांत प्रत्यक्ष स्थळपाहणीची गरज नाही, तेथे थेट नोंद दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ajit Pawar : अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे का?

सदर प्रक्रियेमुळे अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबरऐवजी आता ३ नोव्हेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१ जुलै २०२५ नुसार बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात एकूण ६९,०३५ मतदार नोंदलेले आहेत. आता आक्षेपांनंतरच्या बदलामुळे विविध प्रभागांतील मतसंख्या व घटक संघटनांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांनी मतदारांच्या आकडेमोडीचे नवे गणित मांडण्यास सुरुवात केली आहे.

Investigation of ‘Vasantdada Sugar : शरद पवार अध्यक्ष असलेल्या ‘वसंतदादा शुगर’ची चौकशी !

गत निवडणुकीत बुलढाण्यात काँग्रेसचे ७, शिवसेनेचे १०, भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, अपक्ष १ व अन्य २ नगरसेवक निवडून आले होते. या बलाबलाच्या पार्श्वभूमीवर, सुधारित मतदार यादीमुळे आगामी निवडणुकीत कोणाचा पलडा जड ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.