Ajit Pawar’s NCP to Hold ‘Chintan’ in Nagpur : दिवाळीनंतर होणाऱ्या संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी
Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर अपेक्षित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकसंघ होती, तेव्हा विदर्भाकडे फारसे लक्ष दिले नाही. पण पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाने विदर्भाकडे विशेष लक्ष दिले आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार पूर्व आणि पश्चिम विदर्भात सातत्याने दौरे करताना दिसतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादीने येत्या १९ तारखेला नागपुरात चिंतन शिबिर आयोजित केले आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, १९ सप्टेंबरला नागपुरात चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार, सर्व जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. या शिबिरात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय रणनितीवर चर्चा करण्यात येणार आहे. संघटनात्मक बदल करण्याची गरज आहे का, यावरही चर्चा करण्यात येईल.
Shocking theft : १ कोटींचा रत्नजडित कलश चोरट्यांनी लांबवला !
तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून गल्ली ते दिल्ली पक्षाचा विस्तार कसा करता येईल, यावर या शिबिरात चिंतन करण्यात येणार आहे. मराठा आणि ओबीसीं आरक्षणाचा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. अशा परिस्थितीत हे शिबिर राज्याच्या उपराजधानीत होते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचीही पृष्ठभूमी या शिबिराला आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हे शिबिर महत्वाचे ठरणार आहे.
Contract workers strike : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप १९ व्या दिवशीही सुरूच !
या चिंतन शिबिरात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारीच नव्हे तर येत्या दोन दशकांतील पक्षाच्या कामांची रुपरेषा तयार करण्यात येणार आहे. हे शिबिर पक्षाचे आमदार, खासदार, ज्येष्ठ नेते. युवा प्रतिनिथी आणि देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकसंघ बांधून ठेवणार आहे, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.