Local body elections : जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी; दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

BJP dominates municipal council results : २८६ पैकी ८९ जागांवर भाजपचा विजय, काँग्रेसला ६० जागा

Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल रविवारी (२१ डिसेंबर) जाहीर करण्यात आला. या निकालात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील एकूण २८६ नगरसेवक पदांपैकी भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
काँग्रेस पक्षाने ६० जागा जिंकत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

शिंदे सेनेला ४६, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २६ जागांवर यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला १३, तर उद्धव सेनेला १० जागांवर समाधान मानावे लागले. स्थानिक आघाड्यांनी १७, तर अपक्ष उमेदवारांनी १२ जागांवर विजय मिळवला आहे.
जिल्ह्यातील १० नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते, तर देऊळगाव राजा नगरपालिका व तीन नगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान पार पडले. सर्व निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले.

 

 

Nagar Parishad Result : मालवण–कणकवलीत शिंदे सेनेचा वरचष्मा!

या निवडणुकीचा एकूण निकाल संमिश्र स्वरूपाचा ठरला आहे. बुलढाणा, खामगाव व चिखली येथे अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. जिल्ह्यातील ११ नगराध्यक्ष पदांपैकी चार ठिकाणी भाजप, तीन ठिकाणी काँग्रेस, तर उद्धव सेना, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एका ठिकाणी विजय मिळाला आहे.