BJP Prepares to Break the Congress Stronghold : मलकापूर नगरपरिषदेतील राजकीय डावपेच, आमदाराच्या रणनितीकडे लक्ष
Malkapur केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी मलकापूर नगरपरिषद हा काँग्रेसचा अखेरचा गड मानला जातो. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही सत्ता भाजपासाठी राजकीयदृष्ट्या अस्वस्थ करणारी ठरली आहे. त्यामुळेच यंदाची निवडणूक भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि महत्त्वाकांक्षेची लढत ठरणार आहे.
मलकापूर नगरपरिषद गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या नियंत्रणाखाली आहे. स्थानिक नेतृत्व, जातीय समीकरणे आणि मजबूत संघटनशक्तीमुळे भाजपाला अद्याप ठसा उमटवता आला नव्हता. मात्र या वेळेस परिस्थिती बदललेली दिसत आहे. आमदार संचेती यांनी नगरपरिषदेत एकछत्री भाजप सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार केला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक पुनर्रचना, गुप्त राजकीय संवाद, तसेच नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याची मोहीम सुरू असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
Local Body Elections : मतदार याद्यांतील गोंधळावर शिक्कामोर्तब!
भाजपने अद्याप नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र “जिंकणारा आणि योग्य चेहरा कोण?” या प्रश्नावर सध्या पक्षात चर्चेचे तापमान चांगलेच वाढले आहे. अंतिम निर्णयाचा अधिकार आमदार संचेतींच्याच हातात असल्याने, त्यांनी शेवटच्या क्षणी एखादा राजकीय धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर संचेतींची रणनीती योग्य दिशेने गेली, उमेदवार योग्य निवडला गेला आणि युतीचा निर्णय अनुकूल ठरला, तर मलकापूर नगरपरिषदेत भाजपाचा भगवा झेंडा फडकण्याची शक्यता अत्यंत प्रबळ मानली जात आहे.
तथापि, सध्याच्या राजकीय वातावरणात तीन घटक निर्णायक ठरणार आहेत —
उमेदवार निवड, युतीची दिशा, आणि काँग्रेसमधील गटबाजीचा परिणाम.
Sampada Munde Suicide : प्रशासनाने दुर्लक्ष केले, जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेना युतीबाबतचा अंतिम निर्णय निवडणुकीच्या तोंडावर होण्याची शक्यता आहे. जर दोन्ही पक्ष महायुतीच्या स्वरूपात एकत्र आले, तर विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहील. मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले, तर काँग्रेसला थोडासा दिलासा मिळू शकतो.
Ajit Pawar : अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे का?
दरम्यान, काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी आणि नाराजी भाजपासाठी राजकीय ऑक्सिजन ठरू शकते. नाराज नेते अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून लढले, तर भाजप बहुमताच्या जवळ पोहोचू शकतो.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, “आमदार संचेती यांची रणनीती यशस्वी ठरल्यास मलकापूर नगरराजकारणात काँग्रेसचा इतिहास संपून भाजपाच्या भगव्या अध्यायाची सुरुवात होईल.”








