Local Body Elections : भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत?

BJP preparing to fight on its own : स्थानिक निवडणुकीत पक्षाची क्षमता आजमावण्याची शक्यता

Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) ‘स्वबळा’ची रणनीती आखत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींसाठी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ‘स्वबळावर लढा’ हे धोरण सूचित केले आहे.

मागील आठवड्यात बुलढाण्यात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत “स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकवा” असा स्पष्ट संदेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. “या निवडणुका कार्यकर्त्यांची असतात, त्यामुळे तयारीला लागा”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यामुळे भाजप आता युतीच्या समीकरणांपेक्षा स्वबळावर आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Local Body Elections : राजकीय अस्थैर्याचे निवडणुकीवर सावट!

 

भाजपने २०१६-१७ च्या निवडणुकांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात दमदार कामगिरी करत जिल्हा परिषदेमध्ये २४ जागांवर विजय मिळवून अध्यक्षपद पटकावले होते. पंचायत समितीत ३९ जागा, नगर परिषदेमध्ये ७५ नगरसेवक विजयी झाले हाेते़या कामगिरीने पक्षाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक बळाची चुणूक दाखवली होती.

भाजपसमोर स्थानिक पातळीवर काँग्रेस हेच मुख्य आव्हान ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.काॅंग्रेसची कामगिरीही दमदार झाली हाेती़ काँग्रेसचे १४ जिल्हा परिषद सदस्य, ११ नगरपालिका, १०३ नगरसेवक विजयी झाले हाेते़ तसेच ३१ पंचायत समिती सदस्य होते. ही आकडेवारी पाहता भाजपने स्वबळावर उतरल्यास, सर्वाधिक टक्कर काँग्रेसशीच होण्याची शक्यता आहे.

Local Body Elections : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय संघर्ष वाढला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील भाजपही स्वतंत्र रणनीतीवर विचार करत असल्याचे दिसते.