Breaking

Local Body Elections : युती-आघाडीशी हात मिळवणार नाही; बसपाची भूमिका

BSP to contest NMC election on it’s own : नागपुरात सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार

Nagpur भाजपने महायुतीशिवाय आणि काँग्रेसने महाविकास आघाडीशिवाय नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. अशात आता बहुजन समाज पार्टीने BSP महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत हात न मिळवता स्वबळावर सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बसपाच्या संघटनात्मक रचनेत तीन ते चार वॉर्ड मिळून एक सेक्टर तयार केला जातो. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १८ ते २० सेक्टर असतात. नागपूर लोकसभे अंतर्गत सर्व सेक्टर कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. विधानसभा कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्या आहेत. ५० टक्क्यांहून अधिक बूथ कमिटी स्थापन झाल्या आहेत. या प्रत्येक बूथवर १० लोकांची टीम तयार करण्यात आली आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू आयसीयूमध्ये दाखल; प्रकृती स्थिर

सेक्टरनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीत रिपब्लिकन विचारधारेचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील संघटना यांच्याशी स्थानिक पातळीवर तडजोड केली जाऊ शकते. महापालिका निवडणुकीत उत्तर नागपूर, मध्य नागपूर व दक्षिण नागपूर या तीन विधानसभा मतदारसंघांवर बसपाचा अधिक फोकस असेल. आंबेडकरी विचारधारेला मानणारे मतदार असलेल्या वस्त्यांमध्ये अधिक जोर लावला जाणार आहे.

या महिन्यातच या संबंधिच्या जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोपविण्यात येणार आहेत. नागपूर महापालिकेत २०१७ मध्ये बसपाचे १० नगरसेवक विजयी झाले होते. याशिवाय २० उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विजयी झालेले सर्वच उमेदवार उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील होते. बसपाच्या परफॉर्मन्सचा काँग्रेसला जबर फटका बसला होता.

Bhaskar Jadhav : राज-उद्धव एकत्र येऊ नये यासाठी भाजपची धडपड

त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ घटून २९ वर आले होते. लोकसभा निवडणुकीत बसपाचे नगरसेवक मोहम्मद जमाल अपक्ष म्हणून लढले. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. दोन नगरसेवक काँग्रेस नेत्यांच्या वतुर्ळात दिसतात. मात्र, निवडणुकीच्या काळात सर्वच सोबत असतील, असा बसपा नेत्यांचा दावा आहे.