Chandrashekhar Bawankule’s reply to Dharmaraobaba Atram’s allegations : आज आपल्या सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत
Nagpur : महायुतीचं काम सर्वांनी इमानदारीने केलं. २८८ आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं आहे. प्रफुल पटेल, धर्मरावबाबा काय म्हणाले मला माहिती नाही. पण धर्मरावबाबा यांनी निवडून आणण्यासाठी मी स्वतः दोन बैठका घेतल्या. याने काम केलं नाही, त्याने काम केलं नाही, असं म्हणण्याचे दिवस आता नाहीत. तर आपल्या सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. आता टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण ४० जागांसाठी भाजपला भीक मागायची का? मी कुणाशीही तडजोड करणार नाही. कारण एकीकडे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरोधात उमेदवार उभे करता, त्यांना आर्थिक मदत करत त्या उमेदवाराला पाठबळ देता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजप केली. यासंदर्भात प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीत लढायच्या आहेत. निवडणुका लागल्यावर आम्ही एकत्र बसणार आहोत, असेही ते म्हणाले.
Vidarbha Farmers : कर्जमाफीचे काय झाले? १,२०० रुपये मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले!
लाडक्या बहीणींसाठी दुसऱ्या विभागांचा निधी वळवल्याचा आरोप सरकारवर होतो आहे. यासंदर्भात विचारले असता, मला हे समजत नाही की, अशा बातम्या कोण पेरतात? संभ्रम निर्माण करतात. लाडक्या बहीणींचे हेड वेगळे आहे. सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासी समाजाच्या निधीचे हेड वेगळे आहे. त्यामुळे निधी इकडचा तिकडे करता येत नाही. हा चक्क खोटारडेपणा आहे. काहीतरी बातम्या पेरून सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.