Changes in ward structure schedule, to be completed in October : मुहूर्त दिवाळीनंतर की थेट पुढच्या वर्षी? प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात बदल
Amravati सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने ‘ड’ वर्गातील महापालिकांकरिता सुधारित प्रभाग रचना वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.
नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी ११ जून ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रभाग रचना पूर्ण करण्याचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग रचनेसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया संयुक्तपणे पार पाडावी लागणार आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या आंदोलनानंतर जीवन प्राधिकरण ‘बॅकफुटवर’!
अमरावती महापालिकेत यंदा चार सदस्यीय प्रभाग प्रणाली लागू केली जाणार असून, २२ प्रभागांपैकी २१ प्रभागांत प्रत्येकी ४ सदस्य, तर एका प्रभागात ३ सदस्य अशा एकूण ८७ नगरसेवकांची निवड होईल. ही रचना २०११ च्या जनगणना आधारे करण्यात येणार आहे.
प्रभाग रचनेचे सुधारित वेळापत्रक असे
टप्पा कालावधी
प्रगणक गट मांडणी ११ ते १६ जून
जनगणनेची माहिती तपासणी १७ ते १८ जून
स्थळ पाहणी १९ ते ३० जून
गुगल मॅपवर नकाशे तयार करणे १ ते ५ जुलै
प्रभाग हद्दींची तपासणी ६ ते २४ जुलै
मसुद्यावर स्वाक्षऱ्या २५ जुलै ते ७ ऑगस्ट
प्रारूप प्रस्ताव नगर विकास विभागाकडे १३ ते २५ ऑगस्ट
प्रारूप रचना प्रसिद्धी व हरकती ३ ते ८ सप्टेंबर
हरकतीवर सुनावणी ९ ते १८ सप्टेंबर
अंतिम रचना सादरीकरण १९ ते २२ सप्टेंबर
अंतिम रचना आयोगाला २३ ते २९ सप्टेंबर
आयोगाची अधिसूचना ९ ते १३ ऑक्टोबर
Sushma Andhare : मराठीच्या हितापुढे सगळ्या टीकाटिप्पणी शुल्लक
मतदार यादी लवकरच
सुधारित वेळापत्रकानुसार १० ते १५ दिवसांचा वाढीव कालावधी प्राप्त झाला आहे. अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय निलंगे यांनी दिली.