Local Body Elections : मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती मैदानात!

Chief Minister’s brother Alhad Kaloti enters the election fray : चिखलदरा नगरपरिषदेत प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात

Amravati मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपण ज्या चिखलदऱ्यात गेले, त्या ‘नंदनवनात’ नगरपरिषद निवडणुकीत यंदा ऐतिहासिक घटना घडली आहे. प्रथमच मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांच्या नामांकनामुळे चिखलदऱ्यातील राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. चिखलदऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आल्हाद यांची उमेदवारी महत्त्वाची असल्याचा विश्वास भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.

आमदार रवी राणा यांनी सांगितले की, येत्या काळात चिखलदऱ्यात स्काय वॉक, पर्यटन विकास, रस्ते उभारणी, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प आणि विद्युत प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. त्यामुळे या विकासप्रक्रियेला गती देण्यासाठी आल्हाद कलोती यांची निवड आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच युवा स्वाभिमान पार्टीचा त्यांच्या उमेदवारीला संपूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Local Body Elections : बावनकुळेंच्या कामठीत अजित पवार गटाची नवी राजकीय चाल !

कलोती परिवाराने अंध विद्यालय, सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रम, गवळी समाज, आदिवासी समाज तसेच ओबीसी समाजासाठी सातत्याने काम करत चिखलदऱ्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. “हीच सामाजिक बांधिलकी पुढे नेत चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य अजेंडा असेल,” असे आल्हाद कलोती यांनी नामांकनानंतर स्पष्ट केले. त्यांच्या उमेदवारीमुळे चिखलदऱ्याच्या राजकारणात नवचैतन्य आल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.

Sudhir Mungantiwar : आपल्या पाठपुराव्यामुळे न्यायालय इमारतीला मंजुरी..आभारी आहोत, आ. सुधीरभाऊ!

आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, मेळघाटचे निवडणूक निरीक्षक व माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार केवलराम काळे, प्रभूदास भिलावेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, राजेश मांगलेकर, अन्वर हुसेन, वेदांत सुरपाटणे, गुरू ठाकूर सोमवंशी, जितू पचोरी, तिलक मिश्रा, सूरज तिवारी, पंकज पचोरी, अनुप सोमवंशी, अरुण तायडे, शेख भिक्कम, अमोल हाते, प्रमोद शनवारे, राम हेगडे, रामेश्वर निखाडे आदी उपस्थित होते.