Breaking

Local Body Elections : प्रभाग रचनेचा निर्णय होईना, इच्छुकांचा जीव टांगणीला!

Confusion persists regarding ward structure in municipal elections : नवा आदेश निघणार की, जुनीच पद्धत कायम राहणार; संभ्रम कायम

Amravati महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग रचना २००७च्या धर्तीवरच राहणार की शासन नवा आदेश काढणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेबाबत शासनाने अद्याप कोणताही आदेश निर्गमित केलेला नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांपासून राजकीय पक्षांपर्यंत सगळ्यांमध्येच उत्सुकता वाढली आहे. “आज येईल, उद्या येईल” म्हणता आठवडा उलटूनही आदेश जाहीर झालेला नाही.

प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि अपक्षांनी प्रचारासाठी मैदानात उतरायला सुरुवात करणार आहे. मात्र, आदेश न आल्याने सर्व जण प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा शासनाचा काहीही इरादा नसल्याचेच यावरून स्पष्ट होते.

Maha Politics : आदित्यने आपले ठाकरे हे आडनाव बदलवून घ्यावे !

नवीन जनगणना अद्याप न झाल्याने मागील आकडेवारीनुसारच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे निवडणुका लांबवणे शक्य नसले तरी, त्या दिवाळीनंतरच घेण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष सत्तेत असून, प्रत्येकाने स्वतंत्रपणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये आघाडी किंवा युतीचा फारसा विचार नसल्याचे स्थानिक स्तरावर दिसते. “आघाडीधर्म नको, स्वबळच योग्य” अशी भूमिका बहुतांश नेते घेत आहेत.

Dilip Sananda Resigns : सानंदांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची दुसरी फळी अॅक्टिव्ह

 

२००७प्रमाणेच प्रभागरचना होण्याची शक्यता

२००७च्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या २२ प्रभागांमध्ये ८७ नगरसेवक आहेत. काही लोकसंख्या कमी असलेल्या प्रभागांमध्ये तीन नगरसेवक निवडून येतील. ओबीसीसाठी २३ जागा राखीव राहतील, यापैकी १२ जागा महिलांसाठी असतील. जर पूर्वीचीच प्रभागरचना कायम राहिली, तर फारसा बदल होणार नाही. मात्र, शासनाने नव्या आदेशात बदल सुचवले, तर चित्र वेगळं राहील, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

Dilip Sananda resigns : अखेर दिलीप सानंदा यांचा राजीनामा, काँग्रेसला धक्का!

राजकीय हालचाली जलद गतीने सुरू असून, प्रत्येक पक्षाने संभाव्य उमेदवारांबाबत अंतर्गत व्यूहरचना सुरू केली आहे. कोण कुठून उमेदवारी करणार, कुणाला डावललं जाणार, हे सर्व प्रभागरचना स्पष्ट झाल्यानंतरच ठरेल. त्यामुळे सध्या अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात ‘प्रतीक्षारूपी शांतता’ आहे.