Local Body Elections : सपकाळांनी चिखलीतून दिला ‘सत्ता परत मिळवू’चा नारा !

Congress state president Harshvardhan Sapkal raised the slogan of ‘regaining power’ from the Chikhali of Buldhana District : नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर केला हल्लाबोल

Nagpur : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथून नगरपालिकांच्या नगरपंचायतींच्या निवडणुकीचा नारळ फोडत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणसा-माणसांत दरी निर्माण करण्याचे काम करत आहे. लोकशाही नेस्तनाबूत करून देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा थेट आरोप सपकाळ यांनी केला.

शनिवारी (9 नोव्हेंबर) चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी उपरोक्त घणाघाती टीका केली. बैठकीला बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हा निरीक्षक राजेंद्र राऊत, प्रदेश सचिव राम विजय गुरुकले महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Local Body Elections : बौद्ध समाजाला खरंच प्रतिनिधित्व की भाजपचा राजकीय डाव ?

सपकाळ म्हणाले, देशातील लोकांचे उत्पन्न घटले आहे. युवकांना रोजगार नाही आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत भाजप केवळ घोषणाबाजी आणि फोटो लावून भूमिपूजनाच्या राजकारणात गुंतले आहे. कुठलीही पूर्तता न करता ‘लाव फोटो आणि कर भूमिपूजन’, असा प्रकार करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. राजकारणातील सुसंस्कृतता संपुष्टात आली आहे. विरोधकांना संपवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. आज देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण काँग्रेस पक्ष अजूनही लोकशाही व सामाजिक न्यायाच्या विचारावर ठाम आहे.

Local Body Elections : काँग्रेसचं काही खरं नाही, तिसऱ्या आघाडीच्या हालचालींनी रंगवलं राजकारण !

सकाळ यांनी चिखली नगरपालिकेत काँग्रेसचाच नगराध्यक्षांना निवडून आणा, असे आवाहन उपस्थितांना केले. या निवडणुकीत एकदिलाने काम केल्यास केवळ चिखलीतच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता परत आणता येईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीय वर्तुळात सपकाळ यांच्या या भाषणानंतर काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे भाजप विरोधी भूमिकेवर त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आगामी निवडणुकीत राजकीय वातावरण तापवणार, हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.