Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar are planning a strategy : आगामी निवडणुकांसाठी महायुतीमध्ये बैठकांचा सपाटा
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्यस्थितीत तीन भावांचा दबदबा आहे. हे तीन भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘देवा भाऊ’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच ‘भाई’ आणि ‘दादा’ म्हणजे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीमधील तीन्ही नेत्यांनी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सद्यस्थितीत मुंबईत या बैठका पार पडत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी भाजपचे मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा केली. भाजपला नंबर वन बनवण्यासाठी मेहनत घ्या, अशा सूचना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत. तर आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांना सांगितलं आहे. राजकीय रणनितीकार नरेश अरोरा यांनी सह्यांद्री अतिथीगृहावर अजित पवार यांची भेट गेतली. आगामी निवडणुकांसाठी अरोरा यांची कंपनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करणार, असे संकेत आजच्या भेटीतून मिळत आहेत.
Tara Bhavalkar : हिंदी भाषा सक्तीची असे सरकारने कुठेही म्हटले नाही पण….
महायुतीमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपले मंत्री आणि नेत्यांना विभागवार जबाबदाऱ्यांचे वाटप आज (ता. २५ जून) केले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईसाठी जबाबदाऱ्यांचे वाटप आजच्या बैठकीत करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांचे प्रवेश कसे करवून घेता येतील ते बघा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अजित पवार यांच्या पक्षाचे काम नरेश अरोरा यांची कंपनी करेल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. कारण विधानसभा निवडणुकीतही अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले होते, असेही सूत्र सांगतात.