Breaking

Local Body Elections : आचारसंहितेपूर्वी डीपीएसी कामांना गती; विकासकामे मार्गी लागताहेत

DPAC work accelerated ahead of possible code of conduct : पालकमंत्र्यांच्या लोकप्रतिनिधींना सूचना; जूनमध्येच मागवले प्रस्ताव

Amravati जिल्ह्यातील डीपीएसी (जिल्हा वार्षिक योजना) अंतर्गत विकासकामांना लवकरच गती मिळणार आहे. आचारसंहितेपूर्वीच बहुतांश कामे मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जून महिन्यातच सर्व लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून, सध्या प्रस्ताव प्राप्त होत आहेत. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया साधारणतः १५ जुलैपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व कृषी निविष्ठांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. डीएपी खताचा काही प्रमाणात तुटवडा असला, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरच तो भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Tribal Pardhi : पाणगाव ग्रामपंचायतीचा ‘तो’ ठराव अखेर रद्द ! ‘सत्तावेध’ इम्पॅक्ट

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘एक दिवस बळीराजासाठी’ हे अभियान यापुढेही सुरू राहणार असून, दर महिन्याच्या एका ठराविक दिवशी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवतील. अलीकडेच या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १२६० कृषी केंद्रांची पाहणी करण्यात आली.

Local Body Elections : ऑक्टोबरमध्ये प्रभाग रचना पूर्ण होणार, मग निवडणूक कधी होणार?

दरम्यान, राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची १०० टक्के नोंदणी व्हावी यासाठी गावागावात शिबिरे घेतली जात असून, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांना यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. विभागप्रमुखांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया वेगात सुरू आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांकडे लवकरच आयडी उपलब्ध होईल, अशी माहिती येरेकर यांनी दिली.