Election Commission to hold video conference with District Collectors on July 10 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश
Akola राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांची पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स आढावा बैठक १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे. निवडणूक यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेऊन लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीत निवडणूक घेण्यात येणाऱ्या संस्थांची यादी, मतदारसंख्या, मतदान केंद्रांचे नियोजन, ईव्हीएम उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ, तसेच संभाव्य अडचणी यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील तपशील ९ जुलैपर्यंत निश्चित नमुन्यात सादर करण्याचे निर्देश दिले असून, मास्टर ट्रेनर्सची यादी व अतिरिक्त प्रशिक्षकांची आवश्यकता असल्यास ती माहितीही मागविण्यात आली आहे.
Vidarbha Farmers : बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीची वेळ
राज्य शासनाने पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर परिषद आणि महानगरपालिकांमध्ये प्रभाग निश्चितीची प्रक्रिया हाती घेतली आहे. प्रारूप आराखडे तयार करून शासनाकडे सादर करण्याचे काम सुरू आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर हे आराखडे निवडणूक आयोगाकडे पाठवले जाणार आहेत. त्यानंतर आयोग निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे घोषित करणार आहे.
Local Body Elections : सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांची राजकीय गणिते फसली
अमरावती विभाग हा पश्चिम विदर्भातील महत्त्वाचा प्रशासकीय विभाग आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :
महानगरपालिका : २ (अमरावती, अकोला)
नगरपालिका : ४१
नगरपंचायती : १६
जिल्हा परिषद : ५ (अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ)
पंचायत समित्या : ५६