Local Body Elections : अतिवृष्टी, पूरस्थितीचा फटका; निवडणुका पुढे ढकलल्या!

Elections postponed due to heavy rains and flood situation : ४५ दिवसांसाठी आदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण

Amravati राज्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग बाधित होण्याची शक्यता असल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सहकार विभागाने २६ सप्टेंबरपासून ४५ दिवसांसाठी निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश शुक्रवारी काढले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही थेट शेतकऱ्यांशी निगडित असल्याने अशा कठीण परिस्थितीत त्यांचा सहभाग शक्य नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४(३)(अ) अंतर्गत सरकारला अशा परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे.

OBC reservation : उपोषण सोडले, पण मुंबई बंदचा इशारा!

तथापि, न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे, त्या बाजार समित्या वगळता उर्वरित सर्व समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्यापासूनच पुढील ४५ दिवसांनी सुरू केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Vidarbha State : नागपूर कराराची होळी, पुन्हा वेगळ्या विदर्भाची मागणी

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांची लगबग सुरू होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासन यंत्रणा व सहकार विभागाचे कर्मचारी व्यस्त राहतील. यामुळे पुढेही १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांना आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचे सहकार विभागात बोलले जात आहे.